महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ एप्रिल । श्रीलंकेच्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर नियुक्तीच्या एका दिवसानंतर, नवीन अर्थमंत्री अली साबरी यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी सोमवारी अन्य तीन मंत्र्यांसह शपथ घेतली होती. श्रीलंकेत आता औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. यानंतर देशात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. याचा अर्थ राज्याच्या आरोग्य सुविधा आता केवळ आपत्कालीन परिस्थितीला प्राधान्य देणार आहेत. सध्याचे आर्थिक संकट असेच सुरू राहिल्यास औषधांचा तुटवडा अत्यंत गंभीर स्थितीला पोहोचेल असे मानले जात आहे.
श्रीलंकेच्या आर्थिक संकटावर विरोधकांनी राष्ट्रपती गोटाबाया यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर गोटाबाया राजपक्षे यांनी आपण श्रीलंकेचे राष्ट्रपतिपद सोडणार नसल्याचे सांगितले. तथापि, संसदेत 113 जागांवर बहुमत सिद्ध करणाऱ्या कोणत्याही पक्षाकडे सत्ता सोपवण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रीलंकेतील राजकीय पक्षांमधील परस्पर तणाव कमी होण्याचे नाव घेत नाहीये. विरोधी पक्षांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांचे एकत्रित मंत्रिमंडळात सामील होण्याचे आवाहन धुडकावले.
सोमवारी आंदोलकांच्या एका गटाने पंतप्रधानांच्या निवासस्थान टेम्पल ट्रीला घेराव घातला. हे लोक देशात आणीबाणी आणि कर्फ्यूला विरोध करत होते.श्रीलंकन सैन्याचे म्हणणे आहे की, ते नेहमी गरजेनुसार राज्याच्या संरक्षणासाठी तयार राहते. संरक्षण दल नेहमीच संविधानाचे पालन करते.श्रीलंकेचे कॅबिनेट मंत्री जॉन्सन फर्नांडो यांनी दावा केला आहे की, राष्ट्रपतींना राजीनामा देण्याची गरज नाही. त्यांना आता जनतेचा पाठिंबा आहे.
श्रीलंकेत औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. यानंतर देशात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. याचा अर्थ राज्यातील आरोग्य सुविधा आता केवळ आपत्कालीन रुग्णांना प्राधान्य देणार आहेत. एएनआयने श्रीलंकन वृत्तपत्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, सध्याचे आर्थिक संकट असेच चालू राहिल्यास औषधांचा तुटवडा अत्यंत गंभीर स्थितीला पोहोचेल.
श्रीलंकेच्या मध्यवर्ती बँकेचे माजी अधिकारी नंदलाल वीरासिंघे हे 7 एप्रिल रोजी मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. अजित निवार्ड काब्राल यांनी सोमवारी गंभीर आर्थिक संकटात गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता.