![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ एप्रिल । पृथ्वीच्या तापमानातील वाढ दीड डिग्रीइतकीच रोखून धरण्याचा जगभरातील अभ्यासक आणि राज्यकर्त्यांनी एकत्र येऊन केलेला निर्धार व्यर्थ जाईल, अशी भीती आहे. येत्या २०२५ मध्येच हा दीड डिग्रीचा टप्पा गाठला जाईल आणि त्यापुढच्या काही वर्षांमध्ये त्याच्या दुप्पट, ३ डिग्री इतके तापमान वाढू शकेल, अशी भीती इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ने सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या सहाव्या अहवालात व्यक्त केली आहे.
अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
– २०१९ हरितगृह-वायू उत्सर्जन ५९ अब्ज मॅट्रिक टनांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले.
– फ्लाेरिनेटेड गॅसेस २ टक्के, नायट्रस ऑक्साइड ४ टक्के, तर मिथेनचा वापर १८%नी वाढला.
– २०१०-१९ पर्यंत हरितवायू उत्सर्जन वाढले असले तरी ते २००९ पर्यंतच्या सरासरीपेक्षा कमी आहे.
-गेल्या दशकात प्रति जीडीपी ऊर्जेचा वापर २ टक्क्यांनी कमी झाला; पण त्याचा फायदा झाला नाही.
यावर उपाय काय?
– जीवाश्म इंधनाचे उत्सर्जन थांबवावे लागेल.
– पॅरिस करारात २०३० चे प्राथमिक व २०५० पर्यंतचे ठेवलेले लक्ष्य आता २०२५ व २०४० पूर्वी गाठावे लागेल.
– हरितवायू व कार्बन उत्सर्जन २०३० पर्यंत निम्मे करण्याची आवश्यकता आहे.
– हरितवायूचे उत्सर्जन २०३० पर्यंत ४३ % व २०५० पर्यंत ८४ % खाली आणावे पाहिजे.
– हरितवायू उत्सर्जन कमी हाेऊ शकतो हे १८ देशांनी दाखवून दिले, ही सकारात्मक बाब आहे.
४४.२अंश
अकोला जगात सर्वांत उष्ण मंगळवारी जगातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोल्यात झाली. नायझर देशातील बिर्नी एन कोन्नी (४४ अंश) दुसरे उष्ण ठरले. टॉप पाच शहरांत नवाबशाह (पाक) व एनगुल्ग्मी (नायझर) व टिलाबेरी यांचा समावेश आहे.