![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ एप्रिल । गेल्या साधारण दोन आठवड्यांपासून देशातील इंधनाच्या किंमती प्रचंड वेगाने वाढत आहेत. जवळपास दर दिवशी 80 पैसे याप्रमाणे गेल्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 9 रुपयांनी वाढल्या आहेत. देशातील पाच राज्यांमधील निवडणुका पार पडल्यानंतर सरकारने इंधनाचे दर वाढवण्याचा सपाटा लावला आहे. या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलचे भाव 74 ते 84 पैशांनी वाढले आहेत तर डिझेलचे दर 75 ते 85 पैशांनी वाढले आहेत. दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोल 105.41 रुपये प्रती लीटर तर डिझेल 96.67 रुपये प्रती लीटरने मिळत आहे. (Petrol-Diesel Price Today)
पुण्यामध्ये पेट्रोलची किंमत 119.96 रुपये तर डिझेलची किंमत 102.67 रुपये प्रती लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 115.12 रुपये तर डिझेलचे दर 99.83 रुपये प्रती लीटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 110.85 रुपये प्रती लीटर तर डिझेलचे दर 100.94 रुपये प्रती लीटर आहे. गेल्या चार नोव्हेंबरनंतर या दोन्ही इंधनाच्या दरात कसल्याही प्रकारची वाढ करण्यात आली नव्हती मात्र, देशातील निवडणुका पार पडल्यानंतर हे दर झपाट्याने वाढताना दिसून येत आहेत. (Petrol-Diesel Price Today)
असा तपासा तुमच्या शहरातील आजचा लेटेस्ट दर
पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS द्वारेही (How to check Diesel Petrol Price Daily) जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. IOCL च्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.