महाराष्ट्र २४; ऑनलाईन :पुणे; राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून आकडा ६९० च्या घरात गेला आहे.राज्याला कोरोना विषाणूने मगरीमिठी मारली आहे. एका रात्रीत नव्याने ५५ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे राज्याची परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे.
आज (दि .०५) मुंबईत २९, पुण्यात १७, पिंपरी चिंचवड ४, औरंगाबाद २, नगरमध्ये ३ असे ५५ नवे रूग्ण सापडले. त्यामुळे राज्यातील बाधितांचा आकडा ६९० वर पोहचला.
पुण्यातील ससुन रूग्णालयात आज कोरोनाबाधित दोन रूग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील मृतांच्या आकड्यात वाढ झाली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. पुण्यात कोरोनामुळे चोवीस तासात आणखी दोन बळी गेले.
ससून रूग्णालयात ३ एप्रिलला मृत आणल्या गेलेल्या ६० वर्षांच्या महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली. यापूर्वी तिची चाचणी निगेटिव्ह आली होती. या पाठोपाठ याच रूग्णालयात ५२ वर्षीय कोरोनाबाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. या रूग्णाला मधुमेहाचा आजार होता.