कोरोना ; मोदीनी केली विरोधकांशी चर्चा ; मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत,

Spread the love

महाराष्ट्र २४; ऑनलाईन :पुणे; देशात करोना व्हायरसचा प्रदुर्भाव दिवसांगणिक वाढतच आहे. देशातील करोनाग्रस्तांची संख्या चार हजारांकडे गेली आहे. काही दिवसांमध्ये भारतात करोना व्हायरस तिसऱ्या स्टेजला जाईल.त्यावेळी काय उपाय योजना केली पाहिजे. कोणती पावले उचलली जाणार…याबाबत विस्ताराने चर्चा चर्चा झाली.करोना व्हायरसचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोठी मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी विरोधकांशी फोनवर चर्चा केली आहे. प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार, सर्व राजकीय पक्ष आणि समाजातील प्रत्येक घटकांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत आहे. त्याअंतर्गत मोदींनी आज, रविवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि प्रतिभा पाटील, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि देवगौडा यांच्याशी चर्चा केली. याशिवाय समाजवादी पार्टीचे (एसपी) ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव, तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दल (बीजद) सुप्रीमो आणि ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, डीएमके प्रमुख एमके स्टालिन. तसेच तेलंगणाच्या सीएम केसीआरशी फोनवर बोलले. अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांनाही फोन केला.

पंतप्रधान कार्यालयातील खात्रीलालक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मोदी यांनी सर्वात आधी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना फोन करून कोरोनाच्या मुद्द्यावर भाष्य केले. यानंतर त्यांनी प्रतिभा पाटील यांच्याशीही चर्चा केली. यासोबतच त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि एचडी देवगौडा यांना फोन केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *