सोमय्यांनी आयएनएस विक्रांतच्या नावाखाली पैसे खाल्ले; हा विक्रांत फाईल्स घोटाळा – संजय राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ एप्रिल । भाजप नेते किरीट सौमय्या (Kirit Somaiya) यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी जमा केलेले पैसे राज्यपाल कार्यालयात पोहचले नाहीत, अशी धक्कदायक माहिती आरटीआयमधून उघडकीस आली आहे. याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आयएनएस विक्रांतच्या (INS Vikrant) नावाखाली ५७ कोटी रुपये सोमय्यांनी जमा केले होते, ते पैसे कुठे गेले असा असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर काल (५ एप्रिल) ईडीने कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली होती. त्यानंतर राऊतही अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पत्रकार पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राऊत आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, 2013-14 आणि 2014-15 मध्ये आयएनएस विक्रांत या लढाऊ जहाजाला भंगारात काढण्यात आलं. यामुळे लोकांमध्ये संताप होता. या जहाजाचं स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी तेव्हा झाली होती. किरीट सोमय्या यांनी या जहाजासाठी सेव्ह विक्रांत चळवळ सुरु केली आणि लाखो लोकांकडून पैसे गोळा केले. ही रक्कम जवळपास 57 ते 58 कोटी रुपये होती असा दावा राऊतांनी केला. मात्र हे पैसे राजभवनात जमा झालेच नाहीत असा खळबळजनक दावा राऊतांनी केली आहे. यावेळी त्यांनी एक पत्रकही दाखवले. आरटीआय कार्यकर्ते उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून या प्रकरणात माहिती मागवली होती. असे कोणतेही पैसै मिळाले नसल्याचं आरटीआयमध्ये उघड करण्यात आलं आहे. याचाच संदर्भ देत राऊतांनाी सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

जर ही रक्कम राजभवनात जमा केली नसेल तर कुठे गेली, ही रक्कम कुणाच्या घशात गेली. ही रक्कम राऊतांच्या कंपनीत तर गेली नाही ना असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित करत सोमय्यांनी देशद्रोह केला असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच याबाबत तपास व्हावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.

आयएनएस विक्रांत राज्यातच राहावी यासाठी किरीट सौमय्यांनी पैसै जमा केले होते. भारतीय नौदलातून निवृत्त करण्यात आलेली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत ६० कोटी रूपयांना लिलाव करण्यात आला. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेने १९७१ सालच्या भारत-पाकिस्तान युद्धामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. १९६१ मध्ये नौदलात दाखल झालेल्या आयएनएस विक्रांत’ची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने यापूर्वीच असमर्थता दर्शविली होती. ‘आयएनएस विक्रांत’चा लिलाव न करता या युद्धनौकेचे संग्रहालयात रूपांतर करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. लिलाव प्रक्रियेत आयबी कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने ६० कोटींच्या मोबदल्यात ‘आयएनएस विक्रांत’ खरेदी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *