महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.६ एप्रिल । मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी घेतलेली सभा चांगलीच गाजली. या सभेत त्यांनी मशीदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे राजकारण तापलं होतं. राज ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे मनसेचे (MNS) अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाराज झाले होते. पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी राज ठाकरेंच्या ‘मशीदीसमोर स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याच्या’ आदेशावर आक्षेप घेत त्याची अंमलबजावणी करणार नसल्याचं म्हटलं होतं. आता तेच वसंत मोरे पक्षाला रामराम ठोकणाऱ्या पुण्यातील नाराज पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. याबाबत त्यांनी एक सूचक ट्विट केलं आहे. (mns pune city president vasant more express his feelings in the tweet)
एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले ना की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही.
जेव्हा एखादा नेता पक्षाचा राजीनामा देतो ना तेव्हा नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असतो पण जेव्हा एखादा शाखाअध्यक्ष, एखादा कार्यकर्ता राजीनामा देतो ना तेव्हा त्याला जरूर समजावून संगायला पाहिजे.
१/३ pic.twitter.com/CBQHwGS4qo— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) April 5, 2022
नेमकं काय म्हणाले वसंत मोरे –
पुण्यातील मनसेचे शिलेदार वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकणाऱ्या पुण्यातील (Pune) पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. याबाबत त्यांनी सूचक ट्विट (Tweet) केलंय. यात वसंत मोरे म्हणाले की, “एखाद्या किल्ल्याचे बुरुज ढासाळायला लागले ना की किल्ला पडायलाही वेळ लागत नाही. जेव्हा एखादा नेता पक्षाचा राजीनामा देतो ना तेव्हा नक्की त्याचा काहीतरी स्वार्थ असतो पण जेव्हा एखादा शाखाअध्यक्ष, एखादा कार्यकर्ता राजीनामा देतो ना तेव्हा त्याला जरूर समजावून संगायला पाहिजे. तेव्हा आज शाखा अध्यक्ष माजिद शेख व वाहतूक उपशहराध्यक्ष शहाबाज पंजाबी यांच्या घरी गटनेते साईनाथ बाबर जनाधिकार शहराध्यक्ष नरेंद्र तांबोळी, उपशहराध्यक्ष आशिष देवधर, विभागाध्यक्ष गणेश भोकरे, महिला विभागाध्यक्ष सौ.नीता पालवे, उपशहराध्यक्ष अझहर सय्यद, एसटी कामगार शहर अध्यक्ष ललित तींडे, महिला उपविभागाध्यक्ष नाझ इनामदार, शाखाध्यक्ष सलीम सय्यद, मोहसीन शिकालकार, विजय रजपूत, संग्राम तळेकर यांचेसह भेटून आलो. पोरांच्या चेहऱ्यावर काय हसू आलं राव! जय मनसे!” वसंत मोरे यांच्या या ट्विटवरुन पुण्यातील मनसे समर्थकांमध्ये चर्चांना उधाण आलंय. यातून ते राज ठाकरेंना विनंतीवजा सूचना करत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय.