महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० एप्रिल । गेल्या हंगामातील आयपीएलची विजेता असलेली चेन्नई टीम या हंगामात खूपच खराब कामगिरी करत आहे. आतापर्यंत एकही सामना जिंकण्यात चेन्नईला यश आलं नाही. चेन्नईचा सलग चौथा पराभव झाला आहे. केन विल्यमसनच्या टीमने चेन्नईवर दणदणीत विजय मिळवला.
हैदराबाद टीमने पहिला विजय मिळवत आनंद साजरा केला. तर जडेजाला मोठा धक्का बसला आहे. सलग चार सामन्यांमध्ये स्फोटक फलंदाज ऋतुराज गायकवाडची कामगिरी लाजीरवाणी होती.
ऋतुराज गायकवडचा आयपीएल 2022 मध्ये सतत फ्लॉप शो दिसत आहे. धावा काढण्यात त्याला अजिबात यश येत नाही. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 16 धावा करून ऋतुराज गायकवाड आऊट झाला. याआधी त्याने लखनऊ विरुद्ध 1 धाव आणि पंजाब किंग्ज विरुद्ध 1 धाव काढली होती. त्याचवेळी केकेआरविरुद्ध ऋतुराज एकही धाव न काढता आऊट झाला.
ऋतुराज गायकवाडचा खराब फॉर्म टीमसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. टीममधील सुरुवातच चांगली होऊ शकत नसल्याने मिडल ऑर्डरमधील दबाव वाढत आहे. त्यामुळे टीम मोठा स्कोअर उभा करू शकत नाही.
हैदराबाद विरुद्ध सामन्यात ऋतुराज गायकवाडमुळे पराभूत झाल्याने तो टीममध्ये खलनायक बनला आहे. त्याच्या सततच्या खराब फॉर्ममुळे त्याला पुढच्या सामन्यात टीममधून बाहेर बसवलं जाऊ शकतं. रविंद्र जडेजा ऋतुराज गायकवाडबाबत मोठा निर्णय घेऊ शकतो.