RR vs LSG, Pitch Report : राजस्थान विरुद्ध लखनौ रंगणार सामना, ‘या’ खेळाडूंकडे सर्वांचे लक्ष, कशी असेल मैदानाची स्थिती?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१० एप्रिल । आयपीएलमध्ये आज दोन सामने पार पडणार असून दुसरा सामना सायंकाळी साडेसात वाजता राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपरजायंट्स (RR vs LSG) या संघामध्ये पार पडणार आहे. मुंबईच्या प्रसिद्ध अशा वानखेडे मैदानात हा सामना पार पडणार आहे. दोन्ही संघ यंदा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. कारण लखनौने चार पैकी तीन सामने जिंकले असून राजस्थानने देखील तीन पैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यामुळे दोघेही यंदा दमदार फॉर्ममध्ये असल्याने आजचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.

कसा आहे पिच रिपोर्ट?

आजचा सामना पार पडणाऱ्या वानखेडे मैदानात सायंकाळी दुसऱ्या संघाच्या गोलंदाजीवेळी दव अधिक पडत असल्याने प्रथम गोलंदाजी करणं पसंत करतात. प्रथम गोलंदाजी करुन संघाला कमी धावात रोखून समोरील लक्ष्य लवकरात लवकर पूर्ण करण्याची रणनीती नाणेफेक जिंकणाऱ्या संघाची असते. राजस्थानने आजवर वानखेडेच्या मैदानात खेळलेल्या 14 पैकी 8 सामन्यात विजय मिळवला असून लखनौने खेळलेल्या एकमेव सामन्यात ते पराभूत झाले आहेत.

राजस्थान विरुद्ध लखनौ अशी असेल ड्रीम 11 (RR vs LSG Best Dream 11)

विकेटकीपर- जोस बटलर, संजू सॅमसन, क्विंटन डी कॉक

फलंदाज- यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, केएल राहुल

ऑलराउंडर- शिमरॉन हेटमायर, हुडा

गोलंदाज- ट्रेंट बोल्ट, चहल , आवेश खान.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *