महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.११ एप्रिल । दोन दिवसांपूर्वी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं प्रेझेंटेशन भाजपनं तयार केलं असल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Ruat) यांनी केला होता. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरु असल्याचे राऊत म्हणाले होते. या कटाचे सुत्रधार भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, आता या वादात मनसेने उडी घेतली आहे. मनसेचे संदीप देशपांडे यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचा भाजप (BJP) कट रचतंय या खासदार राऊत यांच्या वक्तव्याला त्यांनी प्रतित्त्युर दिलं आहे. यात देशपांडे (Sandeep Deshpande) म्हणतात, विचार, भ्रमकार, सामनावीर यांनी जो हिशोब ‘इ. डी’ला (ED) द्यायचा आहे, त्याची चिंता करावी. राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असताना मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्या बापातही नाही, असे खडे बोल त्यांनी सुनावले आहेत.
विचार भ्रमकार सामनावीर यांनी जो हिशोब "इ. डी" द्यायचाय त्याची चिंता करावी, राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असताना मुंबई महाराष्ट्रा पासून वेगळी करण्याची हिंमत कोण्याच्या बापात नाही
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) April 11, 2022