महाराष्ट्र २४- ऑनलाईन ; नवी दिल्ली: ‘करोना विषाणूविरुद्धची लढाई ही दीर्घकालीन लढाई असून, देशातील १३० कोटी जनता या युद्धामध्ये जिंकण्याच्या इच्छाशक्तीने एक झाली आहे’, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपुढे ५ आग्रह धरले आहेत. हे ५ आग्रह महत्त्वाचे संकल्प असून त्यांद्वारे करोनाचा पराभव करण्यात मोठी मदत मिळेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. करोनाशी लढताना केलेल्या चांगल्या प्रयत्नांचे जगभर कौतुक होत असल्याचेही मोदी म्हणाले. ते भारतीय जनता पक्षाच्या ४० व्या स्थापना दिनानिमित्त भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.