*उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला*
कळंब:- सध्या उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रातील वाढती उष्णता आणि त्यामुळे मानवी व पशु-पक्षी यांना होणारे त्रास कमी व्हावेत ..अन्न-पाण्याविना कोणत्याही पक्षाचा जीव जाऊ नये.
याच भावनेतुन कळंब शहरातील सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे अमर (बाबू) चाऊस यांनी पक्ष्यांसाठी घरटे मिळतील ज्यांना हवे असतील त्यांनी संपर्क साधावा आम्ही त्यांना घरटे उपलब्ध करून देऊन अशी हाक सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती..
कळंब शहर व तालुक्यातुन या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळाला ज्यांना हे घरटे हवे होते त्यांना ते घरटे सुपूर्द करण्यात आले..
मात्र ही पोस्ट वायरल होऊन चक्क परराज्यात पोहोचली याचा परिणाम म्हणून हरियाणा राज्यातील सामाजिक भान असणाऱ्या एक्या सुजान नागरिका कडून अमर चाऊस यांना घरट्याची मागणी करण्यात आली आज हरियाणा राज्यातील सफीदो जिल्यातील,सिंघाना या गावी भाजप तालुका अध्यक्ष अजित दादा पिंगळे व इम्रान भाई मुल्ला यांच्या शुभ हस्ते पोस्टाने ते आज पाठवण्यात आले यावेळी रणजीत चंदनशिवे,तानाजी चव्हाण यासह पोस्टातील कर्मचारी उपस्थित होते.