सहा वर्षाच्या अरफान मिर्झाने धरला कडक (उपवास) रोजा

Spread the love

Loading

 

*उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला*

कळंब : कळंबच्या सहा वर्षीय अरफान रशीद मिर्झा या चिमुकल्याने कडक असा रमजानचा उपवास (रोजा) धरला होता. सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. या महिन्यात महिनाभर उपवास धरत अल्लाहची इबादत करत असतात. इस्लाम धर्मीयांमध्ये 7 वर्षानंतर रोजा पकडणे अनिवार्य असते. मात्र कळंब येथील सहा वर्षीय अरफान मिर्झा याने आपल्याला देखील रोजा पकडायचा आहे, असा हट्ट आपल्या आई-वडिलांकडे केला.यंदाचं रमजान महिना कडक उन्हाळ्यात आला आहे, त्यात अरफान फक्त 6 वर्षांचा आहे. म्हणून त्याचे आई-वडील त्याला नकार देऊ लागले. परंतु दोन तीन तास उपाशी राहून रोजा सोडेल या उद्देशाने त्याला सहेरीला उठवलं. मात्र अरफानने पूर्ण 16 तास अन्न-पाण्याविना 5 वेळेसच्या नमाजसह रोजा पूर्ण केला. त्यामुळे परिसरातील लोकांनी पुष्पहार घालून त्याचं कौतुक केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *