बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; बँका उघडण्याची वेळ बदलली, जाणून घ्या डिटेल्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१८ एप्रिल । बँक ग्राहकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आजपासून (सोमवार) बँका उघडण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता पूर्वीच्या तुलनेत बँका एक तास आधीच उघडणार आहेत. १८ एप्रिल म्हणजेच आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. आजपासून बँका सकाळी ९ वाजता उघडतील. तर बंद होण्याची वेळ पूर्वीप्रमाणेच असेल. बँका एक तास आधीच उघडण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेने (RBI) ने दिले आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण बँकांशी संबंधित कामासाठी ग्राहकांना एका तासाची अतिरिक्त वेळ मिळणार आहे. यापूर्वी बँकांचं कामकाज १० वाजता सुरू होणार होतं. आता सकाळी ९ वाजताच कामकाज सुरू होणार आहे.

आरबीआयच्या या नव्या निर्णयामुळं नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. बहुतांश नोकरदारांना शनिवार किंवा रविवार सुट्टी असते. त्यामुळं बँकांची कामे करता येत नाहीत. आता एक तास आधीच बँका उघडणार असल्याने ऑफिसला जाणाऱ्या नोकरदार वर्गाला ऑफिसला जाण्यापूर्वीच एक तास आधी बँकांची कामे करता येणार आहेत. यापूर्वी बँकांची वेळ ९ वाजताची होती. मात्र, कोरोना महामारीच्या काळात बँका उघडण्याच्या वेळेत बदल करण्यात आला होता. ती वाढवून १० वाजताची करण्यात आली होती. आता कोरोना संकट टळलं आहे. त्यामुळं बँकांची वेळ पूर्ववत करण्यात येत आहे.

पैसे काढण्यासंदर्भात नवीन नियम

आरबीआयने युपीआयद्वारे पैसे काढण्याची सुविधा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ही सुविधा पूर्णपणे कार्डलेस असेल. त्यासाठी तुम्हाला एटीएममध्ये एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डची आवश्यकता नसेल. एटीएम कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे होणाऱ्या फसवणुकांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर युपीआयद्वारे कार्डलेस ट्रांझेक्शन सेवा सुरू करण्यात आली आहे. या सुविधेच्या माध्यमातून युपीआयद्वारे एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *