लष्करी वेढा अभेद्य करा; पुतीन यांचे सैन्याला आदेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२२ एप्रिल । युक्रेनचा पूर्व भाग ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या रशियाने मारिउपोल शहर ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. या शहरातील पोलाद प्रकल्प ताब्यात आला नसला तरी रशियाचे अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी आपल्या सैन्याला वेगळीच सूचना दिली आहे. ‘तीव्र हल्ले करू नका, मात्र वेढा असा आवळा की एक माशीही शहराबाहेर पडता कामा नये,’ असे आदेश पुतीन यांनी दिले आहेत.

मारिउपोल शहराचा बराचसा भाग रशियाच्या नियंत्रणात आला असला तरी एका पोलाद प्रकल्पात काही युक्रेनी सैनिक आणि हजारो नागरिक लपून बसले आहेत. या प्रकल्पाला रशियाच्या सैनिकांनी वेढा घातला आहे. पुतीन यांनी मारिउपोलवर विजय मिळविल्याचा दावा केला आहे. या पोलाद प्रकल्पावर आता हल्ले न करता वेढा मात्र पक्का करा, अशी सूचना पुतीन यांनी केली आहे. मारिउपोलमध्ये अद्यापही काही हजार नागरिक आहेत. पुतीन यांच्या सूचनेनंतर रशियन सैन्याने वेढा आवळला असल्याने या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर पडणे अवघड झाले आहे. अनेक अयशस्वी प्रयत्नांनंतर केवळ चार बस शहराबाहेर पडू शकल्या, असे युक्रेनी अधिकाऱ्यांनी सांगितले.

युद्धाच्या आघाडीवर

स्पेन आणि डेन्मार्कच्या पंतप्रधानांचा किव्ह दौरा

रशियाने ग्रीन कॉरिडॉर जाहीर करावेत : युक्रेन

युरोपमधून रशियाला होणाऱ्या निर्यातीत प्रचंड घट

खेरसन, खारकिव्ह शहराची पूर्ण नाकेबंदी

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत रशिया, बेलारुसवर बंदी

अमेरिकेकडून लवकरच लष्करी मदत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *