महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी – सलमान मुल्ला । दि.२२ एप्रिल । उस्मानाबाद:-गोरगरीबांची लाल परी म्हणुन ओळख असलेल्या एस टी ची चाके कर्मच्यारी संपामुळे रुतली होती. प्रशासनाने वहातुक सुरू ठेवण्याचे आटोकाट प्रयत्न केले.
उस्मानाबाद जिल्ह्यात जवळपास सर्वच आगारातून बसफेऱ्या सुरू करण्यात आले आहेत तसेच जे कर्मचारी कामावर परतत आहेत त्यांना सुद्धा कामावर रुजू करून घेण्यात येत आहे ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्साह देखील कमी झालेला नाही उस्मानाबाद जिल्ह्यात बरेच ठिकाणी गावात सहा महिन्यानंतर प्रथमच आलेल्या एसटी बसचे औक्षण करून पूजन करण्यात आले तसेच चालक वाहक यांना शाल श्रीफळ व हार देऊन सत्कार देखील करण्यात आला..
न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मच्यारी कामावर येत असुन अखेरच्या दिवसापुर्वी उस्मानाबाद विभागातील २६०० कर्मच्याऱ्यांपैकी २२०० म्हणजे ८५ टक्के हजर झाले असुन तब्बल ३१२ गाड्यांच्या माध्यमातुन सर्व फेऱ्या सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे .
प्रवाशांनी पुन्हा महामंडळाला सहकार्य करण्याचे अवाहन केले . एकंदरीत गेली अनेक दिवस ओस पडलेली बस स्थानके पुन्हा प्रवाशांनी फुलली असुन लाल परी रूळावर आली आहे.
आज निलंबीत कर्मच्याऱ्याची प्रत्यक्ष सुनावणी असल्यामुळे जवळपास ५० कर्मच्यारी विभागीय कार्यालयात आले होते.
आज अखेरचा दिवस असल्याने उर्वरित कर्मचारी रूजु झाले आहेत व सर्व फेऱ्या सुरु होतील. सध्या दररोजची अरणींग ३५ लाखाच्या पुढे आहे..
विभागीय नियंत्रक आमृता ताम्हणकर उस्मानाबाद