महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी सलमान मुल्ला । दि.२३ एप्रिल ।उस्मानाबाद:- याबाबत सविस्तर माहिती अशी की उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेना आमदार शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर घोडेगाव येथे काही अज्ञात गुंडांनी जीव घेणे हल्ला करून गोळीबार केल्याची घटना आज रात्रीच्या सुमारास घडली आहे.
सदर घटना घडल्यानंतर काही वेळात पोलीस प्रशासनाने घटनास्थळी हजर झाले. तर पीए राहुल राजळे यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलवण्यात आले. हल्ल्याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
पोलिसानी हल्लेखोरांचा शोध सुरू आहे लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल असे यावेळी सांगितले..