महाराष्ट्र 24 -उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी:-सलमान मुल्ला – कळंब :- येरमाळा तालुका कळंब येथील येडेश्वरी देवी यात्रेत या वर्षी दहा लाखाच्या वर यात्रा करूंची संख्या होती ,या यात्रेचे सुरुवातीपासून चे नियोजन कळंब पोलीस उपविभागाचे पोलीस सहाय्यक अधीक्षक एम .रमेश यांनी केले होते ..
त्यांनी आपल्या उत्कृष्ट व कौशल्य पूर्ण पद्धतीने नियोजन करून यात्रेतील होणारी चोरी, दरोडे सारख्या गुन्हेगारी प्रकारांना आळा घातला हा कळंब उपविभागीय अधिकारी यांचा स्वतंत्र पॅटर्न ठरावा अशा पद्धतीचे त्यांचे नियोजन होते त्यांनी यासाठी आठ जणांचे एक पथक तयार केले होते..
विशेष म्हणजे इतर अधिकाऱ्यावर काम न सोपीवता यात्रेचे दोन दिवस तर स्वतः रात्रंनदिवस विश्रांती व झोप न घेता तहान, भूक विसरून डोळ्यात तेल घालून काम केले चोरीच्या तयारीत असलेले जागेवर 45 जन ताब्यात घेतली या कार्यकुशलते मुळे यात्रेत यावर्षी चोरी ,डाका गुन्हेगारी प्रवृत्तीला मोठा आळा बसला आहे .
अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा उस्मानाबाद जिल्हा ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष, महादेव महाराज अडसुळ यांनी शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार केला. याप्रसंगी यात्रा पथकातील आमलदार के .पी. अंभोरे यांचेही याप्रसंगी स्वागत व अभिनंदन करण्यात आले. सत्काराच्या उत्तरात एम .रमेश यांनी यात्रा नियोजनात नागरिकांनी तसेच यात्रा उत्सव व नियोजनाचे उत्कृष्ट वार्तांकन केले यामुळे चांगले काम करता आले असे सांगितले, सत्कारासाठी, ज्येष्ठ नागरिक प्रकाश काका भडंगे ,मधुकर शिलवंत ,पुरीसर पत्रकार,माधवसिंग राजपूत ,मंगेश यादव ,संदीप कोकाटे सामाजिक कार्यकर्ते बंडू ताटे, सचिन क्षिरसागर यांची उपस्थिती होती.