नितीन गडकरींकडून औरंगाबाद ते पुणे एक्स्प्रेस हायवेची घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल । केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी लवकरच औरंगाबाद ते पुणे एक्स्प्रेस हायवेची होणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे औरंगाबाद ते पुणे प्रवास सुखकर होणार आहे. या नव्या माहामार्गामुळे औरंगाबाद ते पुणे प्रवास सव्वा तासांत पूर्ण करता येणार आहे. मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत 5 हजार 570 कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पाचं लोकार्पण केलं. यावेळी त्यांनी औरंगाबाद ते पुणे एक्स्प्रेस हायवेची घोषणा केली आहे.

औरंगाबाद येथे विविध रस्ते प्रकल्पांच्या उद्घाटन प्रसंगी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. औरंगाबाद येथील जबिंदा लॉन्स येथे व्यासपीठावर नितीन गडकरी यांनी उपस्थीती दर्शवली. नितीन गडकरी यांच्यासोबत अर्थराज्यमंत्री भागवत कराड आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचीही कार्यक्रमाला उपस्थिती होती. यावेळी गडकरी यांनी औरंगाबाद ते पुणे एक्सप्रेस महामार्गाची महत्त्वाची घोषणा केली. या महामार्गावर 140 किलोमीटर वेगाने प्रवास करता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 2024 पूर्वी मराठवाड्यातील सर्व रस्ते अमेरिकेच्या स्टॅंडर्डसारखे असतील असं आश्वासनही गडकरी यांनी दिलं आहे.

आज गडकरी यांच्या हस्ते औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 औरंगाबाद ते तेलवाडी या 3062 कोटीच्या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आलं. तसेच नगर नाका ते केंब्रिज स्कूल या 73 कोटीच्या 14 किलोमीटर रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं. यासह राष्ट्रीय महामार्ग 752 लेन पेव्हड शोल्डर बीटी रोड या 181 कोटींच्या 29 किलोमीटर लांबीच्या रस्ते प्रकल्पाचंही लोकार्पण पार पडलं.

मंत्री गडकरी यांच्या हस्ते विकास कामांचं भूमिपूजनही पार पडलं. यावेळी औरंगाबाद ते पैठण या 1670 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या 42 किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरणाचे भूमिपूजन करण्यात आलं. तसेच राष्ट्रीय महामार्ग 752 विभागातील चिखली दाभाडी तळेगाव या 37 किलोमीटर काँक्रीट रस्त्याचं भूमिपूजनही पार पडलं.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *