महाराष्ट्र २४। विशेष प्रतिनिधी । दि.२४ एप्रिल । मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर सुरू करण्यात येणार आहे. उद्या सोमवार दिनांक 25 एप्रिल पासून परशुराम घाट सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. 25 एप्रिल ते 30 मो पर्यंत परशुराम घाट बंद ठेवण्यात येणार
परशुराम घाटातील कामाला गती देवून पावसाळयापूर्वी रुंदीकरण पूर्ण करणे तसेच आवश्यक तेथे संरक्षण भिंत उभारणे यासाठी ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. साधारणपणे एक महिना हे काम चालेल.पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील दरड हटविणे आवश्यक आहे.अन्यथा पावसाळ्यात दुर्घटना घडून महामार्ग बंद होण्याचा धोका आहे.त्यामुळे दरड काढण्याच्या कामाला गती येणे आवश्यक आहे म्हणून 25 एप्रिल ते 30 मे दरम्यान परशुराम घाट सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद रहाणार आहे.
चारचाकी,दुचाकी अशा कमी वजनाच्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे.लोटे येथून चिरणी आंबडस मार्गे तर चिपळूण येथून कळंबस्ते मार्गे पर्यायी वाहतूक सुरू राहिल.अवजड वाहनांसाठी वाहतूक बंदच रहाणार आहे.