पंतप्रधान मोदींची प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक ; देशात लॉकडाऊन जूनपर्यंत वाढणार ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. काही जीवनावश्यक गोष्टी सोडल्या तर बाकी सगळंच बंद आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हाच एक उपाय आहे. त्यामुळे देशात २१ दिवसासाठी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. आता १४ एप्रिलला लॉकडाऊनला २१ दिवस पूर्ण होणार आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन वाढणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. राज्य सरकार आणि विश्लेषकांनी लॉकडाऊन वाढवण्यासाठी सरकारकडे मागणी केली आहे. कारण अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. 

लॉकडाऊन संपवण्याचा विचार जरी केला तरी सरकारला यासाठी मोठी तयारी करावी लागणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, इतर गोष्टींबाबत थोडी सवलत दिली गेली तरी शाळा, धार्मिक कार्यक्रमावर मात्र बंदच ठेवण्यात येतील. तसेच अधिकाऱ्यांच्या बदल्या देखील सहा महिने होणार नाहीत.

राज्य सरकारांनी केलेल्या मागणीवर केंद्र सरकार विचार करत आहे. कारण प्रत्येक राज्यात वेगवेगळी स्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेतली. ज्यामध्ये अनेकांचं लॉकडाऊन वाढवण्याबाबतच मत होतं.

जूनपर्यंत राहणार लॉकडाऊन? राज्यांनी केलेल्या मागणीनुसार. धार्मिक गोष्टींसाठी एकत्र येण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात येईल. सर्व धर्मांच्या कार्यक्रमांसाठी हा निर्णय़ असेल. कोणालाच यात सूट नसेल. तर शाळा आणि कॉलेज देखील जूनपर्यंत बंद ठेवण्याची मागणी राज्य सरकारांनी केली आहे.

सरकारी क्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या ६ महिन्यासाठी टाळण्यात येतील. जो पर्यंत परिस्थिती नियंत्रणात येत नाही तोपर्यंत हॉटेल, बार देखील पूर्णपणे बंद राहतील. विवाहसोहळे, अंत्यसंस्कार, मोठ्या बैठका, सार्वजनिक कार्यक्रम बंदच राहतील.

दोन आठवडे वाढणार लॉकडाऊन? महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी याआधीच लॉकडाऊन वाढवण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी २ जूनपर्यंत लॉकडाऊन लागू करण्याची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *