महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२९ एप्रिल । देशातील अनेक राज्यात उष्णता (Heat) वाढताना दिसत आहे. तर देशातील अधिकतम राज्यात उष्णतेची लाट पसरली आहे. तर ज्या राज्यांत पाऊस होत नाही तेथे तर परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यातच हवामान विभागाने (Meteorological Department) देशातील काही राज्यात पुन्हा उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच नागरिकांना अधिक सतर्क राहायला सांगितलं आहे.
त्यातच आता अनेक राज्यात सुरू असणाऱ्या विजेच्या (Electricity) संकंटामुळे आगीत तेल ओतण्यासारखी स्थिती झाली आहे. तर काही राज्यांपुढे कोळसा संकंट उभे असल्याच्या बातम्या आल्या आहेत. ज्यामुळे तेथे विजेचे संकंट आणखीन तीव्र झाले आहे. तसेच विजेचे संकंट आता दिल्लीवर ही दिसत असून राज्याचे ऊर्जा मंत्री सत्यंद्र जैन यांनी तात्काळ बैठक घेतली. तसेच त्यांनी केंद्राकडे कोळसा पाठवावा अशी मागणी केली. त्यातच राजस्थान, दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात आणि हरियाणासह अनेक राज्यात सुर्य उष्णाता ओकत आहे. त्यातच या राज्यांना कोळशा तुटवड्यामुळे लोडशेडिंगचाही सामना करावा लागत आहे.