ऑनलाइन कमाईत महावितरण जोरात ; वर्षभरात तब्बल इतके वीज बिल थेट खात्यात जमा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.१ मे। वर्षभरापासून महावितरणची ऑनलाइन कमाई जोरात आहे. एकूण वीज ग्राहकांपैकी 74 टक्के ग्राहकांनी तब्बल 53 हजार 50 कोटी रुपयांचा ऑनलाइन वीज बिलाचा भरणा केला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 98 टक्के उच्चदाब वीज ग्राहक, तर 58 टक्के लघुदाब वीज ग्राहक ऑनलाइनद्वारे वीज बिल भरतात.

महावितरणचे राज्यभरात दोन कोटी 60 लाखांहून अधिक ग्राहक असून महिन्याला पाच ते सहा हजार कोटी रुपयांचे बिलिंग होते. ग्राहकांना आपले वीज बिल घरबसल्या भरता यावे म्हणून ऑनलाइन वीज बिल भरणे, मोबाईल अॅप, ई-वॉलेट उपलब्ध करून दिले आहे. कोरोना महामारीच्या आधी ऑनलाइन वीज बिलाचा भरणा नगण्य होता. मात्र त्यानंतर गेल्या दोन वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. ऑनलाइन वीज बिल भरणाऱया ग्राहकाला वीज बिलाच्या 0.25 टक्के किंवा जास्तीत जास्त 500 रुपयांपर्यंत सवलत मिळते. गेल्या आर्थिक वर्षात लघुदाब ग्राहकांनी एकूण 19 हजार 347 कोटी रुपयांपैकी 9 कोटी 55 लाख रुपयांचे वीज बिलाचा घरबसल्या ऑनलाइन भरणा केला. उच्चदाब वीज ग्राहकांनी 34 हजार 602 कोटी 88 लाख रुपयांचा भरणा केला आहे. यामध्ये पुणे परिमंडळातून सर्वाधिक 105 कोटी रुपये, भांडुपमधून 9931 कोटी रुपये वीज बिलाचा भरणा केला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *