![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.३ मे । सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. रविवारीही दरात कोणताही बदल झालेला नाही. सलग २५ दिवस दरात कोणताही बदल झालेला नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत अजूनही १०० डॉलर प्रति बॅरलच्या वरच आहे. तेल कंपन्यांनी ६ एप्रिलला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटची वाढ केली होती. तेव्हापासून देशातील चार महानगरांसह सर्व प्रमुख शहरांमध्ये तेलाच्या किमती स्थिर आहेत.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-
दिल्ली पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 120.51 रुपये आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर
– चेन्नई पेट्रोल 110.85 रुपये आणि डिझेल 100.94 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपये प्रति लिटर
