LIC IPO : ‘या’ गुंतवणुकदारांसाठी LIC IPO खुला, जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२ मे । मागील काही महिन्यापासून चर्चेत असलेल्या एलआयसीच्या आयपीओचा नारळ अखेर आज फुटला. एलआयसी आयपीओ आजपासून अँकर गुंतवणुकदारांसाठी खुला झाला आहे. तर, बुधवार 4 मेपासून सामान्य गुंतवणुकदारांसाठी आयपीओ खुला होणार आहे. केंद्र सरकार एलआयसीमधील 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे. या माध्यमातून 22.13 कोटी शेअर्सची विक्री करण्यात येणार आहे.

एलआयसीच्या आयपीओमधून केंद्र सरकार 21 हजार कोटी उभारण्याच्या प्रयत्नात आहे. याआधी 60 हजार कोटी रुपये उभारण्यात येणार असल्याची चर्चा होती.

अँकर गुंतवणुकदार म्हणजे कोण?

अँकर गुंतवणुकदार म्हणजे संस्थात्मक गुंतवणुकदार असतात. यामध्ये विविध फर्म, आर्थिक संस्थांचा समावेश होतो. अँकर गुंतवणुकदारांसाठी आयपीओ आधी खुला होतो. अँकर गुंतवणुकदारांना किमान 10 कोटी रुपये गुंतवावे लागतात. संबंधित कंपनी शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर 30 दिवसांत या अँकर गुंतवणुकदारांना शेअर विक्री करता येत नाही.

एलआयसी IPO बाबत महत्त्वाचे मुद्दे:

– एलआयसी कंपनी ही व्यावसायिक कंपनीप्रमाणे संचालक मंडळाकडून चालवण्यात येणार आहे. या संचालक मंडळात 9 संचालकांचा समावेश असून त्यांची नियुक्ती झाली आहे. एलआयसीमध्ये सध्या अध्यक्ष आहेत. वर्ष 2024 पर्यंत अध्यक्षपद राहणार असून त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जबाबदारी असणार आहे.

– एलआयसीकडे 40 लाख कोटींची मालमत्ता असून 30 लाख कोटींचा राखीव निधी आहे. एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे.

– केंद्र सरकार याआधी एलआयसीमधील 5 टक्के हिस्सा विकणार होता. मात्र, बाजारातील अस्थिर परिस्थिती पाहता 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे.

– मागील आर्थिक वर्षात एलआयसीचा आयपीओ येणार होता. मात्र, रशिया-युक्रेन युद्धामुळे आणि बाजारातील अस्थिरतेमुळे आयपीओ उशिराने आला.

– एलआयसी शेअरमधील गुंतवणूक ही दीर्घकाळासाठी उत्तम असल्याचे एलआयसीचे अध्यक्ष एम. आर. कुमार यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *