कलिंगडच्या बियांचे हे देखील फायदे ; सविस्तर पहा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी। दि.३ मे । सध्या उन्हाळ्याचा (Summer) हंगाम सुरू आहे. दुपारच्या वेळी तर उन्हामध्ये आपला जीव लाहीलाही होतो आहे. या हंगामात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. उष्णतेचा सामना करण्यासाठी उन्हाळ्यात अनेकजण कलिंगड (Watermelon) खातात. कारण कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असते. उन्हाळ्यात शरीराची पाण्याची गरज बघता अनेकदा डॉक्टर्स सुध्दा आपल्याला कलिंगड खाण्याचा सल्ला देतात. विशेष म्हणजे तुम्हाला जाणून हे आर्श्चय वाटेल की, कलिंगडच नव्हेतर कलिंगडाच्या बिया देखील आपल्या आरोग्यासाठी (Health) खूप जास्त फायदेशीर असतात.

वाढलेले वजन
अनेक जणांना वाढलेले वजन कमी करायचे असते. मात्र, आॅफिस आणि इतर कामांमुळे त्यांना व्यायाम करण्यासाठी अजिबात वेळ मिळत नाही. मग अशावेळी आपण दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये कलिंगडच्या बियांची पावडर मिक्स करून प्यायला हवी. यामुळे आपल्या शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

रक्तदाब संतुलित
निरोगी राहण्यासाठी आपल्या दररोज्या आहारामध्ये कलिंगडच्या बियांचा नक्कीच समावेश करा. कलिंगड्या बियांमध्ये अमिनो ऍसिड आणि आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. या बियांमुळे रक्तदाब संतुलित राहण्यात मदत होते. तसेच कलिंगड्या बियांचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास देखील मदत होते.

हृदयविकाराचा त्रास
आपल्या आजुबाजूला हृदयविकाराचा त्रास असलेले लोक मोठ्या प्रमाणात आढळतात. जर आपल्यालाही हृदयविकाराचा त्रास होत असेल तर आपणही आहारामध्ये कलिंगडच्या समावेश करावा. उन्हाळ्यात शरीरातील पाणी लवकर कमी होते त्यामुळे उन्हाळ्यात अनेकदा थकल्यासारखं वाटते मग अशावेळी आपण कलिंगड्या बियांची पावडर पाण्यात मिक्स करून घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *