राणा दाम्पत्याला अखेर दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर

Spread the love

Loading

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.४ मे । राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. आज या दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला असून त्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे आता अमरावती येथे कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. अटी शर्तींसह या पती-पत्नींना जामीन मजूंर झाला असून १२ दिवसांनंतर त्यांची कोठडीतून सुटका होणार आहे. राणा दांपत्यांनी पून्हा अशाप्रकारे कायदा हातात घेऊ नये. माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये, पोलिस ठाण्यात हजेरी लावावी अशा काही अटी न्यायालयाकडून देण्यात आल्या आहेत, असे केल्यास जामीन रद्द होऊ शकतो, असेही न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

मागील काही दिवसांपासून मशिदीवरील भोंगे उतरवणे आणि हनुमान चालीसा पठण यावरून राज्यातील वातावरण गढूळ झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसाचे पठण करण्याची घोषणा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी केली होती. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली होती. यांसदर्भात आज न्यायालयात सुनावणी पार पडली. राणा दाम्पत्यांचा जेलमधील मुक्काम वाढला असून आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली आहे. आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा राहत असलेल्या सोसायटीच्या पदाधिकारी आणि उपभोक्ता म्हणून आमदार रवी राणा यांचे नावे नोटीस पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, नवनीत राणा (Navneet Rana) यांना स्पॉंडिलायसिस असून त्यांची प्रकृती (Navneet Rana Health) खालावली आहे. त्यांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तुरुंगात आणले तेव्हापासून राणा यांना जमिनीवर झोपायला लावले जात आहे. त्यामुळे त्यांचा आजार बळावला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आम्ही अनेकदा तपासणीची मागणी केली. पण, आमच्याकडे दुर्लक्ष कऱण्यात आले. त्यांच्या जीवाला काही झालं तर संपूर्ण जबाबदारी तुरुंगाची असेल, असं पत्र नवनीत राणांच्या वकिलांनी सोमवारी तुरुंग अधीक्षकांना दिलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *