महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.४ मे । मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून मुंबईसह राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून बुधवारी दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून राज ठाकरे (Raj Thackeray) जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या चिथावणीला बळी पडू नये, असेही मविआच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. या सगळ्या आरोपांना राज ठाकरे पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली. राज ठाकरेंचा तुमच्यासाठी एकच निरोप आहे. ते आज संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेतील. या पत्रकार परिषदेत ते फक्त एकटेच संवाद साधतील. राज ठाकरे कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देणार नाहीत, असे संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले.