महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ मे । 4 मे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ओ बी सी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले ,परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात तसेच महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या नेतृत्वात येणाऱ्या 2022 च्या महानगर पालिका निवडणुकीत ओ बी सी ना डावलले जाणार नाही. असे मत ओबीसी राष्ट्रवादी संघटना पिंपरी चिंचवड अध्यक्ष विजय लोखंडे यांनी व्यक्त केले .
पुढे बोलताना ते म्हणाले की ,मा. शरदचंद्र जी पवार व मा.अजित पवार यांच्या पुरोगामी विचारांवर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँगेस पक्षात ओबीसी ना कायम च न्याय मिळाला आहे, या पुढे ही ओबीसी कार्यकर्त्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे.