शिर्डी पंढरपुरात भोंग्याविना काकड आरती, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं विठ्ठल समितीकडून पालन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ मे । सुप्रिम कोर्टाच्या (supreme court) निर्णयानुसार विठ्ठल समितीने आज भोंग्याविना (Without loudspeaker)काकड आरती (Kakad Aarti) केली होती. मात्र लोकांना हे समजून घ्यायला थोडा वेळ लागणार आहे. अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. सकाळी चार वाजल्यापासून पावणे सहा वाजेपर्यंत काकड आरती ऐकण्याची नागरिकांना सवय लागलेली आहे. काकड आरतीने परिसरात असलेल्या लोकांची आणि व्यापाऱ्यांची सुरूवात होते. अचानक हा भोंग्याचा प्रश्न उपस्थित झाला. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं पालन विठ्ठल समितीकडून केलं जात आहे.

रोज पंढरपुरात दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. परंतु त्यांना आरती ऐकायला मिळत नसल्याने त्यांनी सुध्दा नाराजी व्यक्त केली आहे. पंढरपुरात मंदीराच्या बाजूला भाविकांची राहायची व्यवस्था आहे. तिथं महाराष्ट्रातून अनेक भाविक येत असतात. सकाळी चार वाजता काकड आरतील सुरूवात व्हायची. . सध्या आरतीचा येत नसल्याने लोकांच्या मनात नाराजी आहे.

राज ठाकरेंनी जो निर्णय घेतला आहे, आपल्या हिंदू लोकांना अधिक भारी पडतं आहे. प्रत्येक हिंदूनी माघार का घ्यावी. इतक्या वर्षांपासून आपल्या परंपरा सुरू आहेत. विठ्ठल मंदीरातील काकड आरती, या आरतीने लोकांची दिनचर्या सुरू होते. ही काकड आरती ऐकण्यासाठी हजारो भाविक थांबलेले असतात. स्पीकरबंद असल्याने त्यांची सु्ध्दा नाराजी आहे. प्रत्येक धार्मिक गोष्टीचा या निर्णयामुळं बंधन येणार आहे. या गोष्टीचा महाराष्ट्र सरकारने विचार करून सुप्रिम कोर्टाच्या डिसीबलप्रमाणे परवानगी देण्यात यावी अशी भावना पंढरपुरात नागरिकांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *