भोंग्यावर कसले बोलताय, महागाईवर बोला : संजय राऊत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ मे । पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, बेरोजगारी बाबत भाजपचा एकतरी नेता, मंत्री बोलतोय का ? भोंग्यावर कसले बोलताय, महागाईवर बोला अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मुंबईमध्ये पत्रकारांनी राऊत यांनी गॅस सिलिंडरच्या दरवाढीबाबत प्रश्न विचारला होता. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले की, ‘महागाईच्या मुद्दावर कोणीच बोलायला तयार नाही. सरकार म्हणून अन्न, वस्त्र निवारा, महागाईवर बोलणं हे तुमचं कर्तव्य आहे. भोंग्यावर बोलणं तुमचं काम नाही’

संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करताना म्हटले की, देशाचे पंतप्रधान हे युरोपच्या दौऱ्यावर जाऊन आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना युक्रेन आणि रशियातील युद्धाची चिंता असून ते या संदर्भात ते मध्यस्थी करत आहेत आणि त्यांचे भक्त त्यांची वाहवा करत आहे. पण या देशातील जनता महागाईशी युद्ध करत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, बेरोजगारी बाबत भाजपचा एकतरी नेता, मंत्री बोलतोय का ?

राज्यात लाऊडस्पीकरच्या मुद्दावरून काहींनी हिंदू-मुस्लमानांत तेढ निर्माण करून दंगे घडवून आणण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला.मशिदीवरील भोंग्याचा ज्यांनी विषय काढला त्याचा सगळ्यात मोठा फटका हिंदू मंदिरांना, भजन कीर्तन करणाऱ्यांना बसला. त्यामुळे या भूमिकेवर सगळ्यात जास्त कोणी नाराज असेल तर तो हिंदू समाज आहे असं संजय राऊत यांनी म्हटले आहे. भोंग्याचा विषय काढणाऱ्यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांना हिंदू समाजात गट निर्माण करून दंगली घडवून आणायच्या आहेत, मात्र सुदैवाने असं काही होऊ शकलं नाही कारण या राज्याची जनता सुजाण आहे असं राऊत यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *