महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ मे । शिवसेना पक्षप्रमुख (Shiv Sena chief) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची येत्या 14 मे रोजी बीकेसीमध्ये जाहीर सभा होणार आहे. या सभेचा टीझर (Teaser) शिवसेनेकडून (Shiv Sena) ट्विट (Tweet) करण्यात आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांच्या भाषणाचा अंश वापरून सभेसाठीचा टीझर तयार करण्यात आला आहे. शिवसेनेनं (Shiv Sena) हा टीझर सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे.
हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातील अंश टीझरमध्ये वापरण्यात आला आहे. “मी शिवसेना प्रमुख जरुर आहे. पण तुमची ताकद माझ्यासोबत आहे, म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे.”, असं टीझरमध्ये बघायला मिळतंय. तसंच साहेबांवर श्रद्धा असणाऱ्या, प्रत्येक शिवसैनिकाने खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला, यायलाच पाहिजे, असं आवाहनंही शिवसेनेनं टीझरमधून केलं आहे.
शिवसंपर्क अभियान..
दिनांक: १४ मे २०२२ | सायं.- ७.०० वाजता
स्थळ : बीकेसी मैदान, मुंबई pic.twitter.com/WJG687Equn— ShivSena – शिवसेना (@ShivSena) May 8, 2022
काल पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी मास्क न लावता भाषण केले आणि 14 तारखेच्या सभेत मनात बरचं साचलंय ते बोलणार आहे, असा विरोधकांना इशाराही दिला. मुंबईमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टयांमध्ये आणि निवासी इमारतींमधील रहिवाशांनाही नळजोडणी मिळावी, यासाठी महानगरपालिकेच्या ‘सर्वांसाठी पाणी ’ या धोरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मास्क काढून जोरदार भाषण केलं.
‘आता आपण माणसात आलोय असं वाटतंय कारण बऱ्याच दिवसांनी माईकसमोर बोलायला लागलो आहे. बऱ्याच दिवसांनी मास्क न घालता बोलत आहे, तसा मास्क काढायचा आहे तो 14 तारखेला काढायचा आहे. आताचा कार्यक्रम हा महापालिकेचा आहे. सर्वांसाठी पाणी देण्याचा कार्यक्रम आहे. त्याच्या राजकारण आणून पाणी गढूळ करणार नाही. प्रत्येकाला याचे भान असले पाहिजे, कुठे काय बोलायचे याचे ज्ञान असले पाहिजे’ असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला.