Viral Video – श्रीलंकेत राजपक्षे समर्थकाची कचऱ्याच्या गाडीतून काढली धिंड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ मे । सोमवारी श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र तरीही त्यांच्याविषयीचा जनतेतील रोष कमी झालेला नाही. आंदोलन करणाऱ्या जमावाने राजपक्षे यांच्या वडिलोपार्जित घराला आग लावली असून राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांचंही घर जाळलं आहे. देशात राजपक्षेंसोबतच आता त्यांच्या समर्थकांनाही लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो व्हिडीओ श्रीलंकेचा असल्याचे बोलले जात आहे. या व्हिडीओत काही लोकांचा जमाव एका व्यक्तीला चक्क कचऱ्याच्या गाडीत टाकून धिंड काढत आहेत. कचऱ्याच्या गाडीतील व्यक्ती ही राजपक्षे यांचा समर्थक असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

श्रीलंका सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. येथे खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. देशात इंधन आणि गॅसचा तुटवडा आहे. तर परिस्थिती अशी आहे की, पेट्रोल आणि डिझेलसाठी लोकांना अनेक तास पंपांवर रांगा लावाव्या लागतात. पेपरफुटीमुळे शैक्षणिक संस्थांच्या परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *