गायीच्या पोटातून काढले तब्बल ५५ किलो प्लास्टिक पिशव्या अन् खिळा…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । जळगाव । शहरात शुक्रवारी कारवाई करत महापालिकेच्या पथकाने ६ टन प्लास्टिक बॅग जप्त केल्या. ह्या बॅग पर्यावरण संवर्धनासाठी व प्राण्यांच्या आरोग्यासाठी हानीकारक असतात याचा प्रत्यय शनिवारी पाहण्यास मिळाला. जिल्हा पशु संवर्धन विभागात एका भटक्या गायीवर केलेल्या शस्त्रक्रियेत तिच्या पोटात तब्बल ५५ किलो प्लास्टिक आणि पैशांची नाणी मिळून आले आहेत. या गाईला जीवदान देण्यास वैद्यकीय अधिकारी यशस्वी ठरले आहेत.

हरीविठ्ठल नगरात एक गाय सुस्त पडून होती. यामुळे परिसरातील नागरिकांनी तिला महाबळ येथील जिल्हा पशु सर्वचिकित्सालयात दाखल केले. पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. मनीष बाविस्कर, पशुधन विकास अधिकारी डॉ. निलेश चोपडे, सहायक प्रफुल जोशी, किशोर जानवे यांच्या वैद्यकीय पथकाने या गायीची शर्तीचे प्रयत्न करून शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून तब्बल ५५ किलो प्लास्टिक बॅग, खिळा, एक-एक रुपयाचे दोन नाणे बाहेर काढण्यात आले.

पचनक्रिया बंद पडल्याने गाय सुस्त…

नागरिक भाजीपाला उर्वरित कचरा प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये टाकून फेकून देतात. जनावरे तो कचरा चारा समजून ती प्लास्टिक कॅरीबॅग देखील खात असतात. याचप्रमाणे या गायीने देखील वर्षानुवर्षे अशा प्रकारचे प्लास्टिक खाल्याने तिच्या पोटात हे सर्व साचत गेले. आज तिच्या पोटात प्लास्टिक शिवाय काहीच नव्हते. यामुळे तिला श्वास घेण्यासाठी त्रास होवू लागला होता. तिची पचनक्रिया बंद पडल्याने ती एकदम सुस्त पडलेली होती. नागरिकांनी भाजीपालाचा उर्वरित भाग प्लास्टिक कॅरी बॅगमध्ये न टाकता केवळ कागदात किंवा असाच टाकून द्यावा, असे आवाहन डॉ. मनीष बाविस्कर यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *