उमरान मलिकच्या वेगामुळे शोएब अख्तरला लागल्या मिरच्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ मे । यंदाच्या आयपीएलमध्ये उमरान मलिक या भारतीय वेगवान गोलंदाजाने आपल्या वेगवान गोलंदाजीने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. 150 प्लसच्या वेगाने गोलंदाजी करणारा उमरान लवकरच टीम इंडियाकडून खेळताना दिसणार आहे. जम्मू-काश्मीरचा हा वेगवान गोलंदाज लवकरच पाकिस्तानचा दिग्गज वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचा विक्रम मोडीत काढू शकतो, असे अनेक दिग्गजांना वाटते. सनरायझर्स हैदराबादकडून खेळणाऱ्या उमरानने यंदाच्या आयपीएल मधील एका सामन्यात 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला. जो आयपीएल इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू ठरला. मात्र उमरानचा वेग पाहून आता शोएब अख्तरच्या पायाखालची जमीन सरकू लागली आहे.

शोएब अख्तर उमरानच्या गोलंदाजीच्या वेगाबद्दल म्हणाला की उमरानने माझा विक्रम मोडला तर मला आनंद होईल. मात्र उमरानने माझा विक्रम मोडता मोडता आपली हाडे मोडू नयेत. त्याने तंदुरुस्त राहावे. स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीत अख्तरने हे वक्तव्य केले. तो म्हणाला की माझ्या विश्वविक्रमाला 20 वर्षे झाली आहेत. मलाही असे वाटते की कोणीतरी माझा हा विक्रम मोडेल.

रावळपिंडी एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध असलेल्या अख्तरने 161.3 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकण्याचा विश्वविक्रम केला आहे. तर उमरानने अलीकडेच आयपीएल मध्ये 157 किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला.

अख्तर पुढे म्हणाला की, भारतीय संघाला आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळायची आहे. अशा स्थितीत उमरान मलिक निश्चितच निवड समितीच्या रडारवर असेल. बीसीसीआयला उमरान मलिकसारख्या वेगवान गोलंदाजावर लक्ष ठेवावे लागेल. तसेच उमरानवर कोणताही ताण नसेल याची काळजी घ्यावी लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *