![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २० जानेवारी |
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
विचारांना नवीन चालना मिळेल. घरातील वातावरण आनंदी असेल. जुने मित्र भेटतील. कामाची दगदग राहील. घरातील कामात दिवस निघून जाईल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
स्त्रीवर्गाच्या मदतीने कामे होतील. अपेक्षित लाभ हाती येईल. तुमचा सन्मान केला जाईल. धार्मिक कामातील सहभागातून समाधान लाभेल. जमिनीची कामे होतील.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
वैवाहिक सौख्य द्विगुणीत होईल. पत्नीला चांगला आर्थिक लाभ होईल. गोड बोलून कामे कराल. कौटुंबिक प्रगती साधता येईल. व्यावसायिक लाभाचा दिवस.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
दिवस सौख्यकारक असेल. चैनीवर भर द्याल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. विचारांना योग्यवेळी आवर घालावी.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
क्रोधावर नियंत्रण ठेवावे. संसर्गजन्य विकारांपासून सावध राहावे. संयम बाळगावा लागेल. क्षणिक सौख्याच्या मागे लागू नका. हातातील कामात विशेष लक्ष घालावे.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
जोडीदाराच्या सहवासात रमाल. जवळच्या मित्रांच्या सहवासाचा लाभ होईल. आरोग्यात सुधारणा होईल. ऐषारामाच्या वस्तूंची खरेदी कराल. तुमचा नावलौकिक वाढेल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
मित्रमंडळींशी सलोखा वाढवावा. अडचणीतून मार्ग काढाल. तुमच्या कामावर सगळे खुश असतील. आर्थिक मान सुधारेल. कामे अपेक्षेनुसार पार पडतील.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
नोकरदारांचा ताण वाढू शकतो. थोरांशी मतभेद टाळावेत. सरकारी कामात विलंब संभवतो. कामाला अपेक्षित गती येईल. जवळचा प्रवास चांगला होईल.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
कौटुंबिक वातावरणात रमून जाल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. वाहन चालवितांना काळजी घ्यावी. आवडीचे पदार्थ खाण्याची हौस पूर्ण कराल. घरगुती कामाच्या वस्तू खरेदी कराल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
पत्नीचे लाडिक हट्ट पुरवावे लागतील. कामानिमित्त घरापासून दूर राहावे लागेल. सांपत्तिक अपेक्षा पूर्ण होतील. चांगले वैवाहिक सौख्य लाभेल. एकमेकांतील जवळीक वाढेल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
काही गोष्टी जुळवून घ्याव्यात. स्वाभाविक विरोध दर्शवू नये. खर्चाकडे लक्ष द्यावे. सामाजिक कामात लक्ष घालाल. महत्त्वकांक्षा बाळगाल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
जनविरोधाकडे दुर्लक्ष करावे. तामसी पदार्थ खाण्याची आवड पूर्ण कराल. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. जवळचे मित्र भेटतील. स्त्रीसमुहात वावराल.