अखेर अंदमानात Monsoon दाखल, केरळमध्ये मुसळधार पावसाचे संकेत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । मे महिन्याच्या मध्यानंतर नागरिक मान्सूनच्या प्रतीक्षेत असतात. त्यात यंदा मान्सून लवकर आल्याने नागरिकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. अखेर अंदमानच्या समुद्रात मान्सून (Monsoon Arrive) दाखल झाला आहे. जवळपास आठवडाभर आधीच मान्सून अंदमानात झाला आहे. पुढील 2 दिवस केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. केरळमध्ये नेहमीपेक्षा पाच दिवस आधी म्हणजे 27 मे रोजीच मान्सून दाखल होईल असा अंदाजही हवामान विभागानं काही दिवसांपूर्वीच व्यक्त केला होता. सर्वसाधारणपणे केरळमध्ये 1 जूनपर्यंत, तळकोकणात 7 जूनपर्यंत आणि मुंबईत 10 जूनच्या आसपास मान्सून दाखल होतो. 15 जुलैपर्यंत संपूर्ण भारतभर मान्सून पसरतो. यंदा मात्र आठवडाभरापूर्वीच मान्सनचं आगमन झालं आहे.

महाराष्ट्रात काय असेल स्थिती?

दरम्यान, कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 16 ते 19 मे दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *