ई-बस (E Bus) सुविधा अपयशी? सिंहगडावरील ई बसमध्ये चार्जिंग नसल्याने प्रवाशांना खाली उतरावे लागले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ मे । पुणे जिल्ह्यात सिंहगडावर ई-बस (E Bus) सुविधा अपयशी झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक पर्यटकांना (Tourist on Sinhagad) याचा फटका बसत आहे. ई बसमध्ये चार्जिंग नसल्याने प्रवाशांना खाली उतरावे लागले होते. काही दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. तेच आता आणखी एक घटना समोर आली आहे. परवाच एका ई-बसला अपघात झाला. तर रविवारी पर्यटकांसाठी चार्जिंगच्या बसच उपलब्ध नसल्याचे समोर आले होते. यामुळे पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागला.

रविवार असल्याने सिंहगडावर पर्यटकांची सिंहगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मात्र, पर्यटकांना खाली आणण्यासाठी बसच उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पर्यटक गडावरच अडकल्याचे पाहायला मिळाले. पर्यटक या संपूर्ण प्रकारामुळे संतप्त झाले होते.

सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी असते. यामुळे येथील वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी तसेच प्रदूषण होऊ नये म्हणून ई-बस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. वनविभागाने हा निर्णय घेतला होता. यानंतर 2 मेपासून ई-बसची सुविधा सुरू करण्यात आली. मात्र, या बसला गडावर जाता आणि येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे समोर आले आहे. या सर्व गोष्टींचा फटका पर्यटकांना बसत आहे.

दोन दिवसांपूर्वीच एका बसला अपघात झाला होता. यामुळे पर्यटक चिडले होते. अशा घटनांनतर प्रशासनाने सतर्क होऊन पर्यटकांसाठी योग्य ती व्यवस्था करणे महत्त्वाचे असते. मात्र, असे काहीही झालेले नाही. याचेच एक उदाहरण रविवारी रात्री समोर आले. शनिवारी आणि रविवारी सिंहगडावर पर्यटकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे पर्यटकांसाठी ई-बसची सुविधा असणे आवश्यक होते. मात्र, चार्जिंग नसल्याने बस गडावरच उभ्या असल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *