LPG Price Hike: महागाईचा बुस्टर डोस ; सिलेंडरच्या दरात विक्रमी वाढ ; पाहा नवे दर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ मे । महागाईमुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असतानाच आता पुन्हा एक झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ (LPG Cylinder price hike) केली आहे. या दरवाढीमुळे आता भारतात घरगुती गॅस सिलेंडरचा दर 1000 रुपयांच्या पार (Domestic LPG Cylinder is above 1000 rupees) पोहोचला आहे. त्यासोबतच व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ झाली आहे. (LPG cylinders price hike check Mumbai, Delhi, Kolkata rates)

आज घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 3 रुपये 50 पैसे इतकी वाढ झाली आहे. त्यामुळे भारतात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव 1000 रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. या दरवाढीमुळे आजपासून 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत दिल्ली आणि मुंबईत 1003 रुपये, कोलकात्यात 1029 रुपये, चेन्नईत 1018.5 रुपये इतका झाला आहे.

या महिन्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. यापूर्वी 7 मे रोजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा दरवाढ करण्यात आली आहे.

देशातील प्रमुख शहरांतील घरगुती LPG Cylinder ची किंमत (14.2 किलो)

दिल्ली – 1003 रुपये प्रति सिलेंडर

मुंबई – 1002.50 रुपये प्रति सिलेंडर

कोलकाता – 1029 रुपये प्रति सिलेंडर

चेन्नई – 1018.50 रुपये प्रति सिलेंडर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *