खाद्यतेलानंतर आता साजूकतूप 100 रुपयांनी महागले, दूध पावडर, क्रिम, बटरचीही दरवाढ; पामतेलामुळे साधे तूपही महाग

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मे । रशिया-युक्रेन युद्धामुळे ठप्प झालेली सूर्यफूल तेलाची आयात दुसरीकडे इंडोनेशियातील अंतर्गत खाद्यतेल संकटामुळे तेथील सरकारने केलेली पामतेलाची निर्यातबंदी यामुळे पामतेलाचे दर भारतात भडकलेले असून प्रथमच सोयाबीन तेल आणि पामतेल यांचे दर जवळपास एकाच पातळीवर पोहोचले आहेत. याचा फटका साधे तूप बनविण्याच्या उत्पादन किमतीवर पडला असून साधे तूप किरकोळ बाजारात तीन महिन्यांत लिटरमागे २० ते ३० रुपयांनी महागले आहे, दुसरीकडे दुधाचे दर सातत्याने वाढत असल्याने साजूक तुपाचे दर तीन महिन्यात १०० रुपये किलोमागे वाढले. इतकेच नाही तर क्रीम, दूध पावडर, बटर या दुग्धजन्य पदार्थांचेही दर वाढले आहे.

साध्या तुपामध्ये खाद्यतेलांचा उपयोग कच्चा माल म्हणून केला जातो. यात ८० टक्के वापर पामतेलाचा होतो. भारतात हॉटेल, रेस्टॉरंट‌‌्स, फरसाण उत्पादक या तेलाचा सर्वात जास्त वापर करतात. भारतात या तेलाची सर्वाधिक आयात इंडोनेशियातून होते. मात्र गेल्या महिन्यापासून देशांतर्गत टंचाईमुळे या देशाने पामतेलाची निर्यातबंदी केल्याने भारतात प्रथमच पामतेलाचे दर सोयाबीन तेलाच्या बरोबर पोहोचले आहेत. यामुळे तुपाचे दर साहजिकच वाढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *