समुद्रात भराव टाकून बनले जगातील पाचवे विमानतळ, राइझ-आर्टविन एअरपोर्ट

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मे । तुर्कीमध्ये समुद्रात भराव टाकून राइझ आर्टविन विमानतळ साकारण्यात आले आहे. केवळ १४ दिवसांत त्याचे लोकार्पणही झाले. तुर्कीत ऑर्डू गिरेसुननंतरचे हे दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ आहे. समुद्रात भराव टाकून केलेले हे जगातील पाचवे विमानतळ ठरले आहे. काळ्या समुद्रात १० काेटी टन दगडांचा भराव टाकून विमानतळ तयार करण्यात आले आहे. येथे पाच मीटर रुंद आणि ४५ मीटर लांब धावपट्टी आहे. क्षेत्रीय परिवहन गरजांची पूर्तता करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जातो. विमानतळाची वार्षिक ३० लाख प्रवाशांची ये-जा क्षमता आहे, असे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *