Kitchen Tips : गॅस बर्नरवरील घाण साफ करण्यासाठी काही टिप्स

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.१९ मे । स्वयंपाकघर घराचा सर्वात महत्वाचा भाग (Kitchen) तो सांभाळण्यासाठी आपण बरेच प्रयत्न करत असतो. त्याची सतत स्वच्छता राखत असतो. स्वयंपाकघरात सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तू म्हणजे गॅस (Gas). गॅस स्टोव्हचा दिवसातून अनेक वेळा वापर आपण करत असतो. कधी स्वयंपाकासाठी, कधी दूध तापवण्यासाठी तर कधी इतर काही कामांसाठी. सततच्या वापरामुळे गॅसचा बर्नर अनेक वेळा घाण होतात. दूध (Milk) उतू गेल्यामुळे किंवा तेल सांडल्यामुळे बर्नरला छिद्रे पडू लागतात. अशावेळी गॅस बर्नरवरील घाण कशी साफ करायची हे पाहूया.

गॅस बर्नरवरील घाण अशी साफ करा.

१. इनोचा वापर आपण अन्नपदार्थांच्या वापरासाठी व अपचन झाल्यावर करतो परंतु, इनोच्या मदतीने गॅस बर्नरमधील घाण काही मिनिटांत साफ होऊ शकते. यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस आणि इनो घाला. या पाण्यात बर्नर १५ मिनिटे राहू द्या. असे केल्यास बर्नर स्वच्छ होईल. उरलेल्या भागाची स्वच्छता डिटर्जंट आणि टूथब्रशच्या मदतीने आपण करु शकतो.

२. आरोग्यासाठी फायदेशीर व तितकेच स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी लिंबू उपयुक्त आहे. लिंबाचा वापर गॅस बर्नर साफ करण्यासाठी केला जाऊ शकतो. लिंबाची साल ब्रास बर्नर साफ करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. लिंबू आणि मीठ घालून बर्नर साफ करण्यासाठी गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मीठ मिसळा. या पाण्यात गॅस बर्नर रात्रभर ठेवा. दुसऱ्या दिवशी लिंबाच्या सालीला मीठ लावून बर्नर स्वच्छ करा. बर्नर चमकण्यास मदत होईल.

३. व्हिनेगरचा वापर आपण बऱ्याचदा खाण्यापिण्यात करतो. तसेच गॅस बर्नर साफ करण्यासाठी देखील याचा अधिक चांगला वापर केला जाऊ शकतो. यासाठी पाण्यात व्हिनेगर घालून त्यात बेकिंग सोडा मिक्स करा. या पाण्यात बर्नर ठेवा. लपलेली घाण बाहेर येईल व बर्नर चमकण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *