Gold-Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ कि घट ? ; जाणून घ्या आजचा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २० मे । Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,३०० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६,१०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६५,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,३०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,५१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३६० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,५७० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,३६० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५०,५७० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,३६० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५०,५७० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६५० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *