महाराष्ट्रातल्या ‘या’ ९ जिल्ह्यात एकही कोरोना रूग्ण नाही

Spread the love

महाराष्ट्र २४- ऑनलाईन -पुणे – आतापर्यंत राज्यात १५७४ लोकांना कोरोनाची लागणी झाली आहे. तर ११० कोरोनाबाधित रूग्णांचा बळी गेला आहे. मुंबईत कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या इतर शहरांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. नंदुरबार, धुळे, सोलापूर, परभणी, नांदेड, वर्धा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या नऊ जिल्ह्यात कोरोनाने प्रवेश केलेला नाही. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाबंदी झाल्यानंतर अनेक जिल्ह्यात ही जिल्हाबंदी कडक पाळण्यात आली. गावातील व्यक्ती बाहेर जाऊ नये आणि बाहेरील व्यक्ती गावात येऊ नये म्हणून गावकऱ्यांनी गावात येणारे सर्व रस्ते बंद करून टाकले.

मुंबईत १००८ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर यामध्ये ६४ लोकांचा बळी गेला आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रातील ९ जिल्हे असे आहेत जिथे कोरोना व्हायरसच्या विषाणूंचा शिरकाव झालेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *