मान्सूनपूर्व पावसाने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ मे । बीड – जिल्ह्यात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने दोन दिवसांपासुन हजेरी लावली आहे. यामुळं कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्याचं (Farmer) होत्याच नव्हत झालं आहे. काही ठिकाणी शेतात काढणीला आलेला कांदा भिजला आहे, तर काही ठिकाणी काढून ठेवलेला कांदा भिजला आहे. यामुळं शेतकऱ्याच मोठ नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यामुळे आंब्याचे पडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात कडा,डोंगरगण,दादेगाव, घाटपिंपरी, धामणगाव परिसरात अवकाळी पाऊस झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची धांदल उडाली. कांद्यासाठी केलेला खर्च निघेल की नाही? अशी चिंता आता त्यांना सतावते आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *