Constipation: बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम असेल तर या आहारापासून दूर राहा ; नाहीतर त्रास जास्तच वाढेल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २१ मे । बद्धकोष्ठता ही पोटाची एक सर्वसामान्य समस्या आहे, जी जगभरातील सुमारे 27 टक्के लोकांना त्रास देत आहे. साधारणपणे, बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम पूर्णपणे आपल्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींवर अवलंबून आहे. हेल्थलाईनच्या माहितीनुसार, आठवड्यातून 3 वेळा कम बॉवेल मूवमेंट होत असेल तर त्या व्यक्तीला बद्धकोष्ठतेची समस्या आहे, असे म्हणता येईल. बद्धकोष्ठतेचा त्रास ज्यांची शारीरिक हालचाल कमी झाली आहे आणि खाण्याच्या सवयी योग्य नाही, अशा लोकांना होतो. अशा परिस्थितीत बद्धकोष्ठता टाळण्यासाठी आहारात काही गोष्टी खाणे टाळणे आवश्यक आहे. या गोष्टींमुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू (Foods Increase Constipation) शकते.

बद्धकोष्ठता असेल तर या गोष्टी कधीही खाऊ नका –

अल्कोहोल –

अल्कोहोलच्या सेवनामुळे शरीरातील डिहायड्रेशनची समस्या वेगाने वाढते आणि शरीरात पाण्याची कमतरता भासते. शरीरात द्रवपदार्थाच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.

ग्लूटेन अन्न –

काही लोकांना ग्लूटेनमुळे बद्धकोष्ठतेचा त्रासही होतो. अशा स्थितीत अशा लोकांनी गहू (गव्हाचे पदार्थ), बार्ली इत्यादी गोष्टी कमी प्रमाणात खाव्यात.

प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड)

जेवणात मैदा, पांढरा तांदूळ, पांढरा पास्ता इत्यादी पदार्थ जास्त प्रमाणात घेतल्यास बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.

दुग्ध पदार्थ –

दुग्धजन्य पदार्थांमध्ये लॅक्टोज आणि फॅट जास्त प्रमाणात आढळतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.

लाल मांस –

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर तुम्ही लाल मांस खाणे टाळायला हवे. कारण त्यात भरपूर चरबी आणि कमी प्रमाणात फायबर असते जे बद्धकोष्ठता वाढवण्याचे काम करते.

तेलकट पदार्थ –

तळलेले अन्न हे संतृप्त चरबीने भरलेले असते जे शरीर पचवू शकत नाही आणि त्यामुळे बद्धकोष्ठता, अपचन आणि हृदयविकार होऊ शकतात. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी तेलकट पदार्थ खाणे टाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *