महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ मे । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांची आज पुण्यात सभा (Raj Thackeray Rally in Pune) होत आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच (Ganesh Kala Krida Manch) येथे ही सभा होत आहे. या सभेसाठी पोलिसांकडून 13 अटी आणि शर्थी लागू केल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मुन्नाभाई’ संबोधत केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देणार का?, मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात पुढील भूमिका काय असणार ? तसेच अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण यांचं आव्हान राज ठाकरे स्वीकारणार का? या सर्व विषयांवर राज ठाकरे आज काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणेश कला क्रीडा मंचची क्षमता 3000 खुर्च्यांची आहे. आणखी एक हजार खुर्च्या आणि 500 जणांची सोफा अशी एकूण साधारण पाच हजार जणांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. लिमिटेड बैठक व्यवस्था असल्यामुळे पासेस देण्यात आले आहेत. सभेची वेळ सकाळी 10 वाजताची दिली आहे. मात्र साधारण सभा सुरू व्हायला 11 वाजतील.