महागाई ; सर्वसामान्यांना थोडा दिलासा ! पेट्रोल, डिझेल आणि गॅसदरात कपात

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ मे । महागाईत होरपळत असलेल्या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने अखेर दिलासा दिला आहे. माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) म्हणाल्या, “आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी करत आहोत. यामुळे पेट्रोलचे दर प्रतिलिटर 9.5 रुपये आणि डिझेलचे दर 7 रुपयांनी (Petrol Diesel Price) कमी होणार आहेत. यामुळे सरकारच्या महसुलावर दरवर्षी सुमारे एक लाख कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (Pradhan Mantri Ujjwala Yojana) नऊ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना आता प्रति सिलिंडर (12 सिलिंडरपर्यंत) 200 रुपये सबसिडी दिली जाईल, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. यामुळे आपल्या माता-भगिनींना मदत होईल, असे ते म्हणाले. यामुळे वार्षिक सुमारे 6100 कोटींच्या महसुलावर परिणाम होईल.

गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये देशातील किरकोळ महागाईचा दर 7.79 टक्क्यांच्या 8 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. किरकोळ महागाईच्या आकडेवारीत ही वाढ खाद्यपदार्थांव्यतिरिक्त इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *