IPL 2022: प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक; कधी, कुठे कोणाविरुद्ध एका क्लिकवर जाणून घ्या…

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२३ मे । आयपीएलच्या १५व्या हंगामातील साखळी लढती संपल्या आहेत. अखेरच्या साखळी लढतीत पंजाब किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा ५ विकेटनी पराभव केला. ही लढत होण्याआधीच प्लेऑफमधील चार संघ निश्चित झाले होते. २१ मे रोजी मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला प्लेऑफचे तिकीट मिळाले. प्लेऑफमध्ये पोहोचणारा आरसीबी हा चौथा संघ ठरला.

साखळी फेरीनंतर गुणतक्त्यात २० गुणांसह गुजरात टायटन्स अव्वल स्थानी आहे. राजस्थान रॉयल्स १८ गुणांसह दुसऱ्या तर तितक्याच गुणांसह लखनौ सुपर जायंट्स तिसऱ्या स्थानावर आहे. आरसीबीने १६ गुणांसह चौथे स्थान मिळाले.

क्वालिफायर १ मध्ये २४ मे रोजी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात लढत होणार आहे. ही लढत कोलकाताच्या इडन्स गार्डन मैदानावर होईल. या लढतीत विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल तर पराभव होणाऱ्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची आणखी एक संधी मिळले. एलिमेनेटरमध्ये २५ मे रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात लढत होईल. या लढतीत विजय मिळवणारा संघ क्वालिफायर २ मध्ये जाईल. गुजरात आणि राजस्थान यांच्यातील पराभव संघाविरुद्ध ही लढत होईल. तर अंतिम लढत २९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी मैदानावर होईल.

आयपीएल प्लेऑफमध्ये यावेळी असे ३ संघ आहेत ज्यांनी एकदाही विजेतेपद मिळवले नाही. दोन संघ तर प्रथमच स्पर्धेत खेळत आहेत. राजस्थानने पहिल्या हंगामाचे विजेतेपद मिळवले होते. तर आरसीबी दोन वेळा फायनलला पोहोचले पण त्यांना जेतेपदाने हुलकावणी दिली. गुजरात आणि लखनौ पहिलाच हंगाम खेळत आहेत.

आयपीएल २०२२ प्लेऑफचे वेळापत्रक

क्वॉलिफायल १
२४ मे- गुजरात विरुद्ध राजस्थान, कोलकाता

एलिमेनेटर
२५ मे- लखनौ विरुद्ध बेंगळुरू, कोलकाता

क्वॉलिफायर २
क्वॉलिफायर १चा पराभूत विरुद्ध एलिमेनेटरचा विजेता, अहमदाबाद

फायनल
२९ मे- क्वॉलिफायर १ चा विजेता विरुद्ध क्वॉलिफायर २चा विजेता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *