एबी डिव्हिलियर्स पुन्हा मैदानात उतरणार, IPL 2023 बेंगळुरूकडून खेळणार

Spread the love

महाराष्ट्र । विशेष प्रतिनिधी । दि.२४ मे । इंडियन प्रीमिअर लीगच्या पंधराव्या हंगामातील प्ले ऑफचे सामने आजपासून सुरू होणार आहेत. पहिला सामना गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स संघामध्ये आज रंगणार असून उद्या सायंकाळी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स संघ भीडणार आहे. या लढतीपूर्वी बेंगळुरुसाठी दक्षिण आफ्रिकेमधून खुशखबर आली आहे. बेंगळुरुचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे.

दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स याने आयपीएलच्या चौदाव्या हंगामानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यामुळे यंदाच्या हंगामामध्ये तो खेळताना दिसला नाही. डिव्हिलियर्सच्या अनुपस्थितीमध्ये दक्षिण आफ्रिकेचाच खेळाडू फाफ डू प्लेसिस याच्या नेतृत्वाखाली बेंगळुरूने प्ले ऑफ गाठली आहे. मात्र आता डिव्हिलियर्स याने आयपीएलच्या आगामी (IPL 2023) हंगामासाठी आपण उपलब्ध असल्याचे म्हटले आहे. मात्र तो खेळाडू म्हणून मैदानात उतरणार की मेण्टॉर किंवा प्रशिक्षकाच्या भूमिकेमध्ये दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पुढील वर्षी आयपीएलमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज असून मी खूप उत्साही आहे. बेंगळुरूचे चिन्नास्वामी मैदान माझ्यासाठी दुसऱ्या घरासारखेच आहे, असे एबी डिव्हिलियर्स म्हणाला. ‘UVSport’शी बोलताना डिव्हिलियर्सने पुनरागमनाबाबत विधान केले आहे. तसेच आरसीबीने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये माजी कर्णधार विराट कोहली याने आपण डिव्हिलियर्सच्या सातत्याने संपर्कात असल्याचे म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *